वॉशिंग्टन – अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अखेर महाभियोग खटला दाखल करण्यात आला असून त्या प्रस्तावावर उद्या (१३ जानेवारी) मतदान होणार आहे. त्यास सभापती नॅन्सी पेलोसी यांनी याची दुजोरा दिला आहे.
आम्ही अमेरिकन राज्यघटना व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तातडीने कार्य करणार आहोत. कारण ट्रम्प यांची ही कृती अमेरिकन राज्यघटना आणि लोकशाही या दोन्हीसाठी धोकादायक आहे. यावर तातडीने कारवाई करण्याचा गरज असल्याचे उपराष्ट्रध्यक्ष पेन्स यांनी डेमॉक्रॅटस पक्षाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांच्याविरूद्ध आरोपांचा मसुदा तयार करण्यात आला असून यांच्याविरूद्ध महाभियोगाची तयारी झाली आहे. परंतु ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही खासदाराने अद्याप त्याचे समर्थन केले नाही. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रतिनिधी सभागृहात सोमवारी महाभियोगाचा प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. या सभागृहात डेमोक्रॅट बहुसंख्य आहेत.
दरम्यान, २० जानेवारी रोजी देशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यास आपण उपस्थित राहणार असल्याचे संकेत उपराष्ट्रध्यक्ष माइक पेन्स यांनी दिले आहेत. या प्रकरणात तो डोनाल्ड ट्रम्पसोबत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यापुर्वीच २० जानेवारीच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी येण्यास नकार दिला होता.