वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणूकीत झालेला आपला पराभव स्वीकारण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार नाहीत. याच दरम्यान ट्रम्प यांनी काही आक्षेपार्ह ट्विट केल्याने ट्रम्प यांनी समर्थक आणि पोलिस यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर ट्रम्प समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि कॅपिटल हिल्सच्या बाहेर गोंधळ घातला. या हिंसाचारानंतर ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांची खाती गोठविली. त्यामुळे सोशल मिडीयावर ट्रम्प यांची मोठी कोंडी झाली आहे.
या संदर्भात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे की, जो बायडेन यांच्या शपथविधीपर्यंत ट्रम्प त्यांचे खाते प्रतिबंधित राहील. ट्रम्प यांचे खाते किमान दोन आठवड्यांपर्यंत लॉक राहील. तसेच त्याला अनिश्चित काळासाठी देखील लॉक केले जाऊ शकते.
ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही ट्रम्पचे खाते १२ तास निलंबित केले आणि त्यांच्याकडून व्हिडिओ संदेशासह तीन ट्विट देखील रोखले. वॉशिंग्टन डीसीमध्ये जाहीर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्विट हटवले. ते आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारे होते. ट्रम्प यांच्या धोरणांचे उल्लंघन सुरूच ठेवले तर ट्रम्प यांचे खाते कायमचे हटवले जाईल, असा इशाराही ट्विटरने दिला आहे.
फेसबुकने देखील ट्रम्प यांच्या खात्यावरही बंदी घातली. या इंटरनेट कंपनीने आपल्या दोन धोरणांचे उल्लंघन करत ही कारवाई केली. फेसबुक आणि यूट्यूबनेही ट्रम्प यांच्या खात्यातून व्हिडिओ काढले. ट्रम्प यांनी संसदेत समर्थकांच्या फाईलिंगचा व्हिडिओ पोस्ट केला. यात ते म्हणाले, आपल्याला शांतता ठेवावी लागेल. फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामनेही ट्रम्पचे खाते चोवीस तास ब्लॉक केले.