नवी दिल्ली – यंदा दिवाळीत तुम्हाला नवीन मोटारी घ्यायची असतील तर ही संधी तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकेल. कारण टोयोटा कंपनीने या सणाच्या हंगामात आपल्या वाहनांवर 75 हजार रुपयांपर्यंतची मोठी सवलत जाहीर केली आहे.
याअंतर्गत ग्राहक टोयोटा इनोव्हा, टोयोटा ग्लान्झा आणि टोयोटा यारीस या वाहनांवर मोठ्या प्रमाणात बचत करू शकतात. याशिवाय अर्बन क्रूझरवर कंपनीकडून कमी किमतीचा ईएमआय देण्यात येत आहे. आता आपण या हंगामामधील सर्व ऑफरबद्दल जाणून घेणार आहोत. यानंतर बजेटमध्ये यापैकी कोणती कार सर्वात चांगली असेल हे आपण ठरवू शकाल.
१ ) टोयोटा इनोव्हा कारला कंपनीकडून एकूण 75,000 रुपयांपर्यंतची संपूर्ण बम्पर सवलत देण्यात येत आहे. ऑफर अंतर्गत ग्राहकांना 25000 रुपयांची रोकड सूट आणि 20000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस मिळेल. त्याचबरोबर जुन्या कारची जागा घेवून नवीन इनोव्हा खरेदी करून ग्राहक एक्सचेंज बोनसखाली 30000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. याशिवाय 9,999 रुपयांच्या कमी किंमतीच्या ईएमआयवर ग्राहक या कारला घरी घेऊ शकतात.
२) टोयोटा यारीस कारची एक्स-शोरूम किंमत 15.66 लाख रुपये आहे ,या दिवाळीवर कंपनीकडून ग्राहकांना एकूण 50,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या महिन्यात ग्राहकांना त्याच्या खरेदीवर 15,000 रुपयांची रोकड सवलत दिली जात आहे. त्याच वेळी, एक्सचेंज बोनस व लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत ग्राहक एकूण 15,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. याशिवाय कॉर्पोरेट कर्मचार्यांना 20,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. याशिवाय ग्राहक 5,777 रुपयांच्या कमी किंमतीच्या ईएमआयवर ही कार घरी घेऊन जाऊ शकतात.
३) टोयोटा ग्लान्झा कारची एक्स-शोरूम किंमत 8.86 लाख रुपये आहे .या दिवाळीमध्ये खरेदी करून ग्राहक एकूण 30,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कंपनीकडून 15,000 रुपयांची रोकड सूट देण्यात येत आहे. त्याच वेळी जुन्या कारच्या जागी नवीन टोयोटा ग्लान्झा खरेदी करून ग्राहक दहा हजार रुपयांपर्यंत बचत करतील. याशिवाय कंपनी खरेदीवर कंपनीकडून 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. याशिवाय ग्राहक 4,666 रुपयांच्या कमी किंमतीच्या ईएमआयवर ही कार घरी घेऊन जाऊ शकतात.
४ )अर्बन क्रूझर कारची एक्स-शोरूम किंमत 7.01 लाख रुपये आहे.याकंपनीकडून या कारवर 5,444 रुपयांची कमी किमतीची ईएमआय देण्यात येत आहे.