मुंबई – व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवर नाराज झालेल्या कोट्यवधी युझर्सने सिग्नल आणि टेलीग्रामकडे धाव घेतली. त्यानंतर या दोन्ही अॅपने नवनवे फिचर्स लॉन्च करायला सुरुवात केली आहे. आता तर व्हॉट्सएपवरील चॅट टेलीग्रामवर आणण्याचेही एक फिचर नव्याने आले आहे.
टेलीग्रामने अलीकडेच जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की युझर्सला व्हॉट्सअॅप, लाईन आणि काकाओ टॉक या अॅपवरील चॅट्स इम्पोर्ट करता येईल. व्हॉट्सअॅपमध्ये ही सुविधा एक्स्पोर्ट चॅट या नावाने पहिल्यापासूनच आहे. यात युझर्स मोअर या ऑप्शनमध्ये जाऊन एक्स्पोर्ट चॅटवर क्लिक करू शकतात. त्यातून एक झीप फाईल तयार होते ती iOS Share Sheet च्या माध्यमातून टेलीग्रामला आणणे शक्य आहे.
एकदा ते झाले की तुम्हाला कोणत्या कॉन्टॅक्टला किंवा ग्रुपला चॅट शेअर करायचे आहे ते सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर सर्व चॅट टेलीग्रामला एक्स्पोर्ट होतील. टेलिग्राममध्ये ते इम्पोर्टेड या ऑप्शनमध्ये बघायला मिळेल. हे नवे फिचर वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. जे युझर व्हॉट्सअॅप सोडून टेलीग्रामवर गेले आहेत त्यांच्यासाठी तर ही आनंदाचीच बातमी आहे.