हर्षल भट, नाशिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाची पायाभरणी होत असतांना जिल्हा परिषद शाळा देखील यात अग्रेसर आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या काल्लेखेतपाडा गावातील जिल्हा परिषद शाळेचा समावेश दर्जेदार शिक्षणाकरिता अग्रगण्य असलेल्या जगभरातील १०० शाळांमध्ये करण्यात आला आहे. टेकडीवरल्या शाळेची अनोखी संकल्पना याच शाळेने राबवली असून देशभरात त्याचे कौतुक केले जात आहे. यात भारतातील एकूण ९ शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या यशाची पोचपावती पुन्हा एकदा काल्लेखेतपाडा येथील शाळेला मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शैक्षणिक चर्चासत्रात’ सहभागी होणारी एकमेव शासकीय शाळेचा मानही यंदा काल्लेखेतपाडा शाळेने पटकावला आहे.
ग्लोबल शोकेस अंतर्गत हा उपक्रम राबण्यात आला आहे. २००१ मध्ये पालकांना संघटीत करून शाळेला सुरुवात करण्यात आली. सद्य स्थितीलाबाल निहाय कृती आराखडा तयार करण्याकडे शाळेचा भर असल्याचे प्राध्यापकांनी सांगितलेआहे. ८ ऑक्टोबर रोजी ज्ञान प्रकाश फाउंडेशनच्या मदतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग सादर करणारआहेत. रोजगार आणि जीवनकौशल्य वाढविणे यासारख्या शैक्षणिक विषयांवर विविध प्रकारच्या कौशल्य प्राप्त करण्यासाठी शंभर शाळा निवडल्या गेल्या आहेत. यंदाच्या जागतिक शैक्षणिक आठवड्यात भाग घेण्यासाठी अर्ज केलेल्या शाळांमधून काल्लेखेतपाडागावातील शाळेची निवड करण्यात आल्याचे मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे यांनी याबाबात माहिती दिली आहे. https://worldeduweek.org येथे जागतिक शैक्षणिक चर्चासत्र पाहता येणार आहे.
गुरे चरतांना अभ्यासाचे धडे
आदिवासी तसेच दुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी डोंगरावर गुरे चरायला गेलेल्या विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. क्षकांनी टेकडीवर जाऊन ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने त्यावर उपाय म्हणून टेकडीवर गुरे चरण्यासाठी गेलेल्या मुलांना तेथेच शिकवण्यात येत आहे. टेकडीवरली अनोखी शाळा म्हणून काल्लेखेतपाडा शाळेने आदर्श निर्माण केला आहे.
शेवटी ध्येयवेड्या शिक्षकांनी उमराणी बु।। येथील काल्लेखेतपाड्याची शाळा जागतिक पातळीवर नेऊन एक आदर्श घडवून आणला. अशा या शाळा-शिक्षकांना त्रिवार वंदन.
अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांना विकसित करण्यासाठी
अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांना विकसित करण्यासाठी
पुढील वाटचालीसाठी
Best of luck