नवी दिल्ली – निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी दावेदार कोणत्याही गोष्टीचा अवलंब करतात. काही नेते तर आपल्या समर्थकांसह पक्ष मुख्यालयासमोर तळ ठोकून बसलेले दिसतात. मात्र कदाचित कोणाचा विश्वास नाही, असा प्रकार घडला केरळमधील एमबीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या ३१ वर्षीय तरूणाने तिकीट मिळाल्यानंतरही निवडणूक लढण्यास नकार दिला.
केरळ मध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून राज्यातील वायनाड जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मानंतवाडी मतदारसंघाशी संबंधित आहे. राज्यात उमेदवाराचा शोध घेताना भाजपने येथून पानिया जमातीतील सुशिक्षित तरुण माणिकुट्टन यांना तिकीट दिले.
गेल्या रविवारी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीतही त्यांचे नाव होते. दरम्यान, याबाबत माहिती देताना या तरूणाने सांगितले की, मी जेव्हा टीव्हीवर माझे नाव पाहिले तेव्हा मला धक्का बसला. पानिया समाजातील तरुणाची पक्षाने उमेदवारीसाठी निवड केल्याबद्दल मला फार आनंद होत आहे, परंतु निवडणूक न लढविण्याचा माझा निर्णय फोनवर पक्षाला कळविला आहे.










