मुंबई – कोरोनामुळे पीपीई कीट वापरणे आरोग्य कर्मचाऱ्यांना बंधनकारक झाले आहे. मात्र, एकदा वापरलेले पीपीई कीट नंतर फेकून दिले जातात. किंबहुना कोरोना विषाणूमुळे त्यांची योग्य विल्हेवाट लावणेच शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. मात्र, भंगारात (स्क्रॅप) टाकलेले पीपीई कीट पासून चक्क कोविड रुग्णांसाठीच बेड तयार करण्याचा प्रकल्प एका महिलेने सुरू केले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने दक्षिण भारतातील या नाविन्यपूर्ण उद्योग आणि महिलेच्या कार्यावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ तयार केला आहे. आणि हाच व्हिडिओ ख्यातनाम उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे या व्हिडिओची जगभर चर्चा सुरू झाली आहे. अशा उद्योगांना आपण बळ द्यायला हवे, असे आवाहनही महिंद्रा यांनी केली आहे.
बघा हा अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1352506908423368704