लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊजवळ शुक्रवारी रात्री एक मोठा रेल्वे अपघात टळला. आनंद विहारहून मुजफ्फरपूरकडे जाणारी सप्तक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस काकोरीजवळ लखनौला येण्यापूर्वी दोन भागात विभागली गेली. रेल्वेचे नुकसान झाले मात्र कोणतीही जिवित हानी झाली नाही.
सुरक्षारक्षकाच्या माहितीवरून अर्धा किलोमीटरवर चालकाने प्रसंगावधान राखत रेल्वे थांबविली. तसेच गार्डने रेल्वे कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली असता तेथे खळबळ उडाली. मात्र ही गाडी अचानक थांबली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मात्र अद्याप कोणत्याही प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही. रात्री उशिरापर्यंत रेल्वेच्या डब्यांना जोडण्याचे काम सुरू होते.
लखनौ येथील रेल्वे चालक, गार्ड आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सप्तक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस रात्री १०.४५ वाजता लखनौला आली. दहा मिनिटांच्या थांबानंतर ते बिहारमधील मुझफ्फरपूरला निघते. काकोरी ओलांडताच सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना जोडण्यासाठी असलेल्या साखळ्या (कपिलंग तुटल्याने )
निघाल्या आणि रेल्वेचे इंजिनसह काही डब्बे पुढे गेले. तर काही डब्बे उलट दिशेने उतारवरून खाली जात होते, त्यामुळे रेल्वे दोन भागात विभागली गेली. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.