साक्री – जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय युवा परिषद साक्री तालुकाच्या वतीने एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले.या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी लढा देणारे खरे कोरोना योद्धे डॉक्टर,पोलीस, स्वछताकामगार,विद्युत कर्मचारी यांचे पत्राद्वारे आभार मानून पत्रपेटीत पत्र टाकून खऱ्या अर्थाने टपाल दिन साजरा करण्यात आला. तसेच पिंपळनेर पोस्ट ऑफिस ला भेट देऊन पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी साक्री तालुका भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे अध्यक्ष यशराज कोठावदे, सचिव आदेश साळुंखे,आशिष धामणे, निनाद शिनकर व कुणाल मुसळे हे उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय युवा परिषदे अंतर्गत अनेक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.