नाशिक – कोरोनामुळे अनेक सण व उत्सवावर बंधन आले असले तरी प्रत्येक जण या अडचणीतून मार्ग काढतो. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्कि. आश्विनी अनिलकुमार आहेर यांनी हरतालिकाची पूजा थेट ऑनलाईन पध्दतीने केली. त्याचा व्हिडीअोही त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला.
आश्विनी आहेर या आर्किटेक्ट असून त्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. माजी आमदार अनिल आहेर यांच्या त्या कन्या आहे. यावर्षीच लॅाकडाऊनमध्येच त्यांचे लग्न झाले. त्यावेळेसही त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. आता ही त्यांनी ही पूजा नाशिक येथे सासरी केली. कोरोना काळात सर्वांनी अशाच पध्दतीने पूजा करावी असे आवाहनही त्यांनी केले.