रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

झेडपीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उदघाटन

by India Darpan
सप्टेंबर 16, 2020 | 1:15 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200916 WA0016

 

नाशिक – जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत  माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सभापती सुरेखा नरेंद्र दराडे, कृषी विभागाचे सभापती  संजय बनकर जिल्हा परिषद सदस्यसिद्धार्थ वनारसे, दीपक शिरसाट तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे उपस्थित होते.

याप्रसंगी या मोहिमेची माहिती देण्यात आली. जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जनजागृती समाजात चांगल्या प्रकारे व्हावी व काय काळजी घ्यावी याविषयी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये हे या पोस्टरमध्ये माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मोहिम काळामध्ये हे पोस्टर विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक घरी आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत भेट देण्यात येणार असून प्रत्येक कुटुंबाची माहिती ती ॲप मध्ये भरली जाणार आहे. तसेच कोमाँरबिड व सारीच्या  संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.  घरातील प्रत्येक व्यक्तीचे तपमान व आजारी वृद्ध व्यक्तींचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण  तपासण्यात येणार असून ताप किंवा कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या पेशंटला वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासून संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवल्या जाणार आहे. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी वरील प्रतिबंधात्मक उपाय योजना शासनाने केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिला बालकल्याण विभाग ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग अत्यंत सूक्ष्म रीतीने नियोजन करून काम करीत आहेत. या मोहिमेवर तालुका आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालय मार्फत नियंत्रित केले जात आहे. जिल्हा स्तरावरील आरोग्य पर्यवेक्षक व अधिकारी यांचेमार्फत संनियंत्रण केले जाणार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवावा व जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात राहून मृत्यूदर कमी व्हावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी गाव पातळीवरील मान्यवर यांचा अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य असणारा आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आरोग्य दूतांना योग्य प्रकारे माहिती देण्यात येऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पांडुरंग कावळे यांचा सत्कार

Next Post

पुणे – सामर्थ्य सेवेचे या ई- बुकचे प्रकाशन

Next Post
IMG 20200916 WA0017

पुणे - सामर्थ्य सेवेचे या ई- बुकचे प्रकाशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011