- नाशिक विभागात प्रथम व राज्यात द्वितीय श्रद्धा अमृतकर – विभागात द्वितीय राखी मोरे
नाशिक : महिला आर्थिक विकास महामंडळ गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय उखाणे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांच्या दालनात पार पडला. पुरस्कारार्थींमध्ये नाशिक विभागात प्रथम व राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या श्रद्धा अमृतकर तसेच विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या राखी मोरे यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकारण उद्यम विकास प्रकल्प अध्यक्ष लीना बनसोड यांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दोघा विजेत्या महिलांना उखाणे म्हणायला लावत त्यांचे कौतुक केले. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्पाची त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात येऊन पुढील काळात बचत गटांना कर्ज वाटप करून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उज्वला बावके, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ संजय गायकवाड, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड अमोल लोहकरे ,जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक अर्धेन्दू शेखर,महिला व बालविकास अधिकरी सुरेखा पाटील,कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ , जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी एम. आर. गायकवाड, प्रकल्प संचालक आत्मा विभाग राजेंद्र निकम , उपसंचालक आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा हेमंत काळे, जिल्हा व्यवस्थापक उमेद कार्यक्रम संदीप गडाख , महिला आर्थिक विकास महामंडळ सहाय्य्क जिल्हा समन्वय अधिकारी रवींद्र पाटील, नितीन खोडके लेखाधिकारी, युवराज उखाडे कार्यक्रम अधिकारी, निलेश थोरात माहिती सल्लागार, दिलीप कळमकर व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव, प्रतिभा घंगाळे गौतमी लोकसंचलित साधन केंद्र निफाड आदी उपस्थित होते.