नाशिक: जिल्हा परिषदेत बुधवारी लेटलतीफांबाबत झाडाझडती घेण्यात आल्यानंतरही गुरुवारी ५ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित न झाल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी नाशिक पंचायत समितीमध्ये आज सरप्राईज व्हिजिट दिली. यामध्ये ३८ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने सदरच्या कर्मचा-यांना नोटीसा देण्याचे निर्देश गटविकास अधिका-यांना देण्यात आले.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालयांमध्ये कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये कर्मचा-यांच्या हजेरीपत्रकांची तपासणी सुरु केली आहे. बुधवारी (दि.२०) कार्यालयीन वेळेनंतर येणाऱ्या १४३ कर्मचा-यांची मुख्य कार्यकारी अधिका-यांनी चांगलीच झाडाझडती घेत यापूढे उशिराने आल्यास कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले होते. आज प्राथमिक शिक्षण विभागातील ४ तर बांधकाम २ विभागातील १ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
नाशिक पंचायत समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड यांनी पावणेदहा वाजता सुरु केलेल्या तपासणीमध्ये सामान्य प्रशासन विभागातील १२, शिक्षण विभागातील ५, लघु पाटबंधारे विभागातील ५, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ३, व बालकल्याण विभागातील ५, पशुसंवर्धन विभागातील २, आरोग्य विभागातील २ तर ४ कंत्राटी कर्मचारी असे एकुण ३८ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. सदर कर्मचा-यांना नोटीसा बजावण्याचे निर्देश गटविकास अधिका-यांना देण्यात आले आहेत.