नाशिक – शाळा बंद, शिक्षण चालु या उपक्रमातंर्गत गाव तेथे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मुलांना वाचण्याची गोडी लागावी, मुलांनी आधिक अधिक पुस्तके वाचावीत यासाठी पिंपळपाडा गावातील मंदीर, गावात तसेच शाळेतील मोळा व्हरांडा येथे दोरी वाचनालय सुरू करण्यात आले आहेत.
या वाचनालयास नाशिक येथील सामाजिक संस्था सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेकडून १०१ ग्रंथालयीन पुस्तके मोफत भेट देण्यात आली. फोरमचेअध्यक्ष प्रमोद गायकवाड ,समन्वयक रामदास शिंदे (दिंडोरी ) समन्वयक जयदीप गायकवाड यांनी ही पुस्तके दिली. याप्रंसगी योगिता गायकवाड मॅडम कोठावदे सर, राऊत सर, कोतवाल सर, आशा वळवी मॅडम, धुळेकर सर, जोपळे सर, वसमतकर सर आदि उपस्थित होते. सदर वाचनालय उद्घाटन प्रंसगी एसएमसीअध्यक्ष रामचंद्र भोये, मुख्य लक्ष्मण गायकवाड पालक, ग्रामस्थ ,विद्यार्थी उपस्थित होते.
याउपक्रमास झेडपी सीईअो लीना बनसोड , गटशिक्षणाधिकारी कनोज, बीटविस्तारअधिकारी सोनार, केंद्रप्रमुख रामदास धात्रक यांनी प्रोत्साहन दिले.