दिंडोरी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळावा लागलेल्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे विधानभवनातील कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने कार्यालय बंद ठेवण्यात येऊन झिरवाळ यांचेसह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी क्वारंटाईन करत त्यांची तपासणी करण्यात आली होती त्यात झिरवाळ यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असून त्यांना नाशिक शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे. तसेच, मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले आहे.