मुंबई – प्रसूती दरम्यान महिलांचं आरोग्य राखण्यासंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या कार्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांचा या लॅन्सेट या विज्ञान क्षेत्रातल्या जागतिक मासिकानं कौतुक काढले आहेत. जगातल्या ज्या भागांमध्ये साधनांची कमतरता आहे, अशा ठिकाणी सुलभ प्रसूती होण्याकरता डॉ. अभय आणि राणी बंग यांनी एक नवी वैद्यकीय पद्धत रूढ केली, असं या मासिकानं म्हटलं आहे.
प्रसूतीवेळच्या निदान आणि उपचार पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉ. राणी बंग यांनी पारंपरिक दायांना विशेष प्रशिक्षण दिलं. सुलभ प्रसूती व्हावी, यासाठी त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि भारत सरकारनं तसंच शेजारच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांनीही डॉ. बंग यांच्या या नव्या पद्धतीचा अवलंब केल्याचं या मासिकाने म्हटलं आहे.