मुंबई – ज्येष्ठ व्यवस्थापक व प्रशिक्षण तज्ज्ञ संदीप सावंत यांचा आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. तशी माहिती पक्षाचे सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
अष्टपैलू प्रशिक्षक, मुंबई विद्यापीठातून साहित्य पदवीधर, नाशिक येथील सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून सावंत यांची ओळख आहे. सावंत यांच्याकडे विक्री, विपणन, अध्यापन, समुपदेशन (अर्थात मानसिक आरोग्य), प्रशिक्षण आणि सल्लामसलत या क्षेत्रातील २० वर्षांचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे. सावंत यांनी अनेक प्रतिष्ठित संस्था व संघटनांच्या अधिकाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण दिले आहे. आम आदमी पक्षाला त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल. आम आदमी पक्षात आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत.” असे मत सचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.