नाशिक : येथील ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांचे आज बुधवार, ७ एप्रिल रोजी कोरोनाशी लढा देताना निधन झाले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले देशपांडे यांनी काही काळ एम.एस.ई.बी. मध्ये नोकरी केली. त्यांनी भुसावळ येथे एक वाचनालय देखील चालविले होते. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. जळगाव येथील दैनिक लोकशाही, तरुण भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत, देशदूत, गावकरी, महाराष्ट्र टाईम्स आदिसंह अनेक पाक्षिक आणि सप्तीहाकात त्यांनी विपुल लेखन केले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
……..
विवेक, मित्रा असा चोर पावलांनी का निघून गेलास…
– प्रा. गिरीश पाटील, नाशिक
नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांचे आज बुधवार, दि. 7 एप्रिल रोजी कोरोनाशी लढा देताना निधन झाले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले देशपांडे यांनी काही काळ एम.एस.ई.बी. मध्ये नोकरी केली. त्यांनी भुसावळ येथे एक वाचनालय देखील चालविले होते.
अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. दैनिकांमध्ये लेखन केले होते. जळगाव येथील दैनिक लोकशाही, तरुण भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत, देशदूत, गावकरी, महाराष्ट्र टाईम्स आदिसंह अनेक पाक्षिक आणि सप्तीहाकात त्यांनी विपुल लेखन केले होते.
विवेक, मित्रा असा चोर पावलांनी का निघून गेलास. दुःखात दोन गोष्टी केल्या असत्या. तर आम्हाला धीर दिला असता . स्वतः नको तेव्हा एक्झीट केली. आमचा विचार होतास तू… आमचा संस्कार होतास तू…सर्व सुख दुःख शेयर केले.
वास्तविक दररोज भावपुर्ण श्रद्धांजलीचे मेसेज बघून मन सुन्न झालं आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अप वर फोटो बघितला की भीती वाटते. कारण काही विपरीत तर नाही ना. आज माझे सहकारी मित्र ब्रीज कुमार परीहार यांनी फोन वर बातमी दिली. आपले देशपांडे साहेब गेले.. क्षणभरासाठी विश्वास बसला नाही. पण दुर्वेवाने बातमी खरी होती.
विवेक देशपांडे यांनी पत्रकारिता आणि कथाकथन मध्ये आपला वेगळा ठसा उमटविला होता.वयाने मोठे होते.पण आमची मैत्री कशी बहरली कळलं नाही.त्यांनी ज्येष्ठ पत्रकार म्हणुन कधी ही मोठेपणा मिरवला नाही.मोठ्या भावासारखे वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळाले. एक नव्हे असंख्य आठवणी आज वेदनादायी ठरतं आहेत. विवेक देशपांडे यांचा मुलगा मंदार देशपांडे देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पत्रकारितेत यशस्वी ठरला. स्व. विवेक देशपांडे यांच्या सर्व कुटुंबाला हा दुःखाचं डोंगर पेलण्याची शक्ती परमेश्वर देवो.
……
—