नवी दिल्ली – आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यासंबंधित कर्मचारी यांना लसीकरण झाल्यानंतर आता ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस देण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. १ मार्चपासून त्यांना ही कोरोना लस देण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व आजारी लोकांसाठी लसीकरण मार्चपासून सुरू होत असल्याने सर्व प्रकारच्या आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाची तयारी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांतील लसीकरणाची तयारी १ मार्चपासून सुरू करण्यास सांगितले आहे.
रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून उपकेंद्रांपर्यंतची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या केंद्रांना लसीकरणासाठी आवश्यक कोल्डचेन तयार करण्यास सांगितले आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम आठवड्यातून कमीतकमी चार दिवस चालविला पाहिजे , असेही मुख्य सचिवांना सांगण्यात आले आहे.
आरोग्य सचिव म्हणाले की, लसीकरण १ जानेवारीपासून सुरू झाले आणि १ फेब्रुवारी रोजी १ कोटींचा टप्पा ओलांडला. अद्याप मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी आणि संबंधित कामगार अद्याप लसीसाठी आले नाहीत. अशा सर्व लोकांना लसी दिली आहे, याचीही खात्री करुन घ्यावी.
या पत्रामध्ये आरोग्य सचिवांनी १ मार्चपासून राज्यांसह लसीकरणाची विस्तृत तयारी करण्याबाबत चर्चा केली आहे,