मुंबई – कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड परीक्षा बघितली जात असून काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम अतिशय भडकले आहेत. त्यामुळेच त्यांनी बांद्रा कॉम्प्लेक्समधील लसीकरण केंद्राचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. केंद्र सरकारचे नियोजन सपशेल कोलमडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोना लसीकरणासाठीचे अॅप बंद पडले असून सर्व लसीकरण केंद्र विना आई-बापाचे असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/sanjaynirupam/status/1366725383396073473