नवी दिल्ली – आसाममध्ये दोन टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. तिसर्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचाराला जोर आलेला आहे. ६ एप्रिलला होणाऱ्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तामुलपूरमध्ये प्रचारसभा झाली. यादरम्यान अशी एक घटना घडली, जिच्यामुळे पंतप्रधान मोदी यांना भाषण थांबवून आपल्या वैद्यकीय पथकाला त्वरित एका कार्यकर्त्याच्या उपचारासाठी पाठवावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामुलपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यादरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्याला पाण्याच्या कमतरतेमुळे त्रास झाला आणि तो बेसुद्ध झाला. सभेला संबोधित करताना पंतप्रधानांचे लक्ष त्या कार्यकर्त्यावर गेले. त्याच्या मदतीसाठी आपल्या वैद्यकीय पथकाला त्वरित पाठवले.
राजकीय अनुभवावरून, जनतेचे प्रेमाची भाषा आणि जनतेच्या आशीर्वादाच्या ताकदीवर आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीेएचे सरकार बनणे निश्चित आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. आसाममध्ये होणार्या विकासकामांमुळे येथील कनेक्टिव्हिटी वाढत आहे. तसेच येथील लोकांचे जीवन सहज आणि सोपे होत आहे. विकासकामांमुळे येथील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
#WATCH: During a rally in Assam's Tamalpur, PM Narendra Modi asked his medical team to help a party worker who faced issues due to dehydration.#AssamAssemblyPolls pic.twitter.com/3Q70GPrtWs
— ANI (@ANI) April 3, 2021