प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारच्या सवयी असतात. त्यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे जेवण करण्याची पद्धत. प्रत्येकाची खाण्याची अथवा जेवण करण्याची पद्धत व सवय वेगवेगळी असते. त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बऱ्यापैकी अंदाज आपण बांधू शकतो. त्याबद्दल माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या काही टिप्स वाचा आणि आपणही अंदाज लावा.
१) खाताना तोंडाचा मचमच आवाज करणारी व्यक्ती बऱ्यापैकी भावनिक व धार्मिक असू शकते. ती सहजच कुणाचाही शब्दावर विश्वास ठेवू शकते. अशा व्यक्तीची आर्थिक परिस्थिती जेवढ्यास तेवढी असते. चार चौघात नको ती गोष्ट बोलून जाणे हा यांचा स्वभाव असतो
२) कटाक्षाने खाताना तोंडाचा आवाज न करणारी व्यक्ती अनप्रेडिक्टेबल असते. आपल्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी इतरांना कळू नये, याची काळजी घेतात. कळाल्यास त्याचा स्रोत शोधतात. इतरांच्या प्रत्येक गोष्टीचा मात्र हे कानोसा घेत असतात.
३) मनासारखा मेनू असेल तरच जेवणार अशा व्यक्ती चांगला सल्लागार असतात.
४) सर्व पदार्थांचा काला करून खाणारी व्यक्ती प्रिय असते. अशा व्यक्ती कायम समाजात मदतीला तत्पर असतात. त्यांना स्वतःचा असा कोणता स्वभाव नसतो. अशा लोकांचे आयुष्य खुली किताब असते.
५) जेवण करताना सतत इकडे-तिकडे पाहत खाणारी तसेच बोटांची फक्त पहिल्या पेराचाच कटाक्षाने वापर करणारी व्यक्ती सतत उणीदुणी काढणारी असू शकते. तब्येतीने बऱ्यापैकी सडपातळ असतात. सतत नकारात्मक बोलत असतात. दीर्घकाळ कोणाचे मित्र नसतात.
६) भरपूर तिखट खाणारी व्यक्ती अतिशय स्पष्ट बोलणारी असते. परंतु कधीकधी चार चौघात हे लोक पाणउतारा करतात. आर्थिक व्यवहारातील गुंतागुंती मध्ये हे लोक फारसे पडत नाहीत.
७) जेवताना पहिला घास गोडाचा घेणारी व्यक्ती बरेचदा स्वतःच्या मनाने चालणारी असते. ऐकावे जनाचे करावे मनाचे असे यांचे असते. आपण अडचणीत आहोत असं सरळ हे लोक मान्य करत नाहीत.
८) एका विशिष्ट जागीच बसून थोडथोड खाणारे लोक आपल्या कोणत्याच बाबतीत इतरांना ताकास तूर लागू देत नाही.
९) स्वतःच्या हाताने मीठ मसाला तिखट नंतर परत वरून टाकून घेणारे लोक कलाप्रेमी अथवा एखाद्या कलेमध्ये पारंगत असतात.
१०) फक्त दुसऱ्यांना भरपूर खाऊ घालणारे, सतत अन्नदान करणारे लोक भावनेचे भुकेले असतात. आतून दुःखी असतात, परंतु या गोष्टी कधीही समोर येऊ देत नाहीत.
११) एकटेच जेवण करणारे, भिंतीकडे तोंड करून जेवणारे अथवा चार चौघात न खाणारे लोक अंतर्गत नात्यांमध्ये सुखी नसतात. अथवा इश्क मे हम तुम्हे क्या बताये किस कदर चोट खाये हुये, असू शकतात.
१२) प्रत्येक वेळी स्वतः मेहनतीने अन्नपदार्थ बनवून दुसऱ्याला जेऊ घालणारी व ते जेवताना पाहून समाधान मानणारी व्यक्ती नात्यांना विशेष महत्त्व देणारी असते. अशा व्यक्तीची भावनिक फसवणूक झाल्यास त्यांना स्वतःला सावरणे कठीण जाते.
१३) स्वयंपाक बनवण्यास पुढाकार घेणारे व तो खाण्यासही पुढाकार घेणारे लोक हे चांगला भावनिक आधार देणारे असतात. त्यांच्यात नेतृत्व गुण असतात……
just read n enjoy tips…
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!