नाशिकरोड -रस्ता ओलांडत असतांना जेलरोड कडून बिटको जाणाऱ्या मालट्रक व दूचाकीची यांच्यात झालेल्या अपघा्तात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. लाखलगाव येथील चंद्रभान अशोक जाधव (४१) हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच १५ एफ वाय ७२०३ वरून पत्नी सोबत प्रेसरोड, कन्या शाळे कडून रस्ता ओलांडत जेलरोड कडे जात होते. जेलरोड कडून येणाऱ्या माल ट्रक क्रमांक एम एच ०४ डी एस ३५१४ ने जोरदार धडक दिली. त्यात माल ट्रकचे चाक पती पत्नी यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.मालट्रक चालक शेख हसन भिकन राहणार सिन्नर यास पोलिसांनी ताब्यात घेतली. जेलरोड रस्त्यावर शाळा, प्रेस, रहिवाशी वाहतूक असल्याने हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहने कोणालाही न घाबरता या रास्ताने वाहतूक करतात. ही रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करावी या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.