जेलरोडला सीसीटिव्ही कॅमेरा बिल्डींगच्या आवारात बसवल्याच्या रागातून चारचाकी पेटवली
नाशिक : सीसीटिव्ही कॅमेरा बिल्डींगच्या आवारात बसवल्याच्या रागातून एकाने चारचाकी पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी पहाटे पंचक जेलरोड परिसरात घडला. याप्रकरणी संतोष काशीनाथ नागरे यांनी तक्रार दाखल केली आहे. कैलास गुरव (रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, शिवरोड, पंचक जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित हे नागरे यांच्या शेजारी राहयला आहेत. नागरे यांनी इमारतीत सीसीटिव्ही बसवल्याचा राग मनात असल्याने गुरव यांनी शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नागरे यांच्या भाच्याची स्विफ्ट कारवर (क्र. एमएच १, व्ही.ए. ०४६२)ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरिक्षक पी.डी. माळी करत आहेत.
……
वडाळा भागात कुटुंबियांना बेदम मारहाण व विनयभंग
नाशिक – वडाळागाव भागात जुन्या वादातून टोळक्याने एका कुटुंबियांना बेदम मारहाण केली.या मारहाणीत पतीला सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इम्रान शहा, सद्दाम शहा (रा. वडाळा गाव) बाल्या (पुर्ण नाव पत्ता नाही) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शनिवारी संशयित हे गरीब नवाज कॉलनी येथे पीडितेच्या घरी आले. त्यांनी पीडितेचा पती व दीर यांना घराबाहेर बोलावून लाकडी दांडे, लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्यांना सोडवण्यासाठी पीडित महिला मध्ये गेली असता तीच्या अंगावरील कपडे फाडून तीचा विनसभंग करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक बोंडे करीत आहेत.
……..
गंगापूर शिवारात महिलेची आत्महत्या
नाशिक- गंगापूर शिवारात राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला गळफास लावून घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री घडली. मनिषा शंकर वसावे (२३, रा. पाटील चाळ, गंगापूर गाव) असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात वसावे यांनी छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही बाबत निदर्शनास आल्यानंतर त्याना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.