जेलरोडला पावणे पाच लाखाची घरफोडी
नाशिक : जेलरोड परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी पावणे लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. त्यात रोकडचाही समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण भिकन गडवे (रा.ड्रिम वास्तू सोसा.पंचक जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गडवे कुटूंबिय बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी (दि.१७) रात्री बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरीत गॅलरीत चढून ही चोरी केली. गॅलरीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून १ लाख १० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ८५ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
—
दोघा भावांना जीवे मारण्याची धमकी
नाशिक : जामीनावर सुटलेल्या भावास हजर कर नाही तर दोघा भावांना जीवे ठार मारू अशी धमकी देल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम शिरसाठ व वैभव बागुल अशी धमकी देणाऱ्या संशयीतांची नावे आहेत. किरण प्रतापसिंग भाटी (रा.बेलदार लेन,रविवार पेठ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती वरून भाटी गुरूवारी (दि.१७) आपल्या घरी असतांना संशयीताने अनधिकृतपणे घरात प्रवेश करून जुन्या वादाची कुरापत काढली. यावेळी त्यांनी भाऊ गणेश भाटी हा जामीनावर सुटला असून त्याला आता आम्ही सोडणार नाही. याप्रसंगी भाऊ घरात नसल्याने संशयीतांनी त्याच्याशी संपर्क साधात जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुसºया दिवशी पुन्हा तक्रारदार भाटी यांना गाठून भावाबाबत विचारपूस केली व त्याला आमचे समोर हजर केले नाही तर दोघांना सोडणार नाही असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
—
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत अनोळखी दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील जैस्वाल गॅरेज परिसरात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक कडून ओझरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एमएच १५ एजे ७३३५ वरील दुचाकी चालकाचा या अपघातात मृत्यु झाला. अनोळखी दुचाकीस्वार मुंबई आग्रा महामार्गाने प्रवास करीत असतांना मेडिकल चौफुली कडून ओझरच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात कारने दुचाकीस धडक दिली. हा अपघात आडगाव शिवारातील जैस्वाल गॅरेज समोर झाला. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. मृत चालकाची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी हवालदार सुरेश नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरूध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
सराईत टोळीकडून मारहाण
नाशिक : गँग बनवित असल्याच्या संशयातून सराईत टोळक्याकडून दोघांभावांसह त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मखमलाबाद रोडवरील शांतीनगर भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल एखंडे,चेतन वाघ व त्यांची दोन साथीदार अशी मारहाण करणाºया संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी ऋषाल रमेश मोहिते (२५ रा.राधाकृष्णनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. ऋषाल गुरूवारी (दि.१७) रात्री भाऊ शुभम मोहिते,महेश कर्पे आणि चेतन खंदारे या मित्रासमवेत घराशेजारील मनपा गार्डनमध्ये गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. कोयते व लाठ्या काठ्या घेवून आलेल्या संशयीत सराईतांनी चौघा मित्रांना गाठले यावेळी तुम्ही दादागिरी करतात का … गँग बनवितात का असे म्हणून शिवीगाळ करीत टोळक्याने मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने उभ्या असलेल्या मोटारसायकली लोटून देत नुकसान केले. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.
—
बंगला बांधकामावरून सामान चोरी
नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याच्या कामावरून चोरट्यांनी लोखंडी पाईप आणि लाईट चोरून नेल्याची घटना मखमलाबाद रोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल जगदिश गवारे (रा.शिवगंगा अपा.जाधव कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. गवारे यांचे बंगल्याचे काम गोकूळ काकड मळा भागातील नाल्याजवळ सुरू आहे. बुधवारी (दि.१६) रात्री अज्ञात चोरट्यांनी काम सुरू असलेल्या बंगल्याच्या टेरेसवर चढून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी २० फुट लांबीचे लोखंडी पाईप आणि एलईडी आणि हॅलोजन बल्ब असा सुमारे २० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
—
कुंभारवाड्यात एकाची आत्महत्या
नाशिक : जुने नाशिक परिसरातील कुंभारवाड्यात राहणाºया ३४ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सचिन दत्तात्रेय टिळे (३४ रा.हॉटेल जनसेवा मागे,काझीगडी) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. सचिन टिळे याने शुक्रवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत.