नाशिक – नाशिकरोड कारागृहातून निर्दोष मुक्त झालेल्या १७ जणांचे विहितगाव चौफुलीवर जंगी स्वागत करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्येही मोठा जमाव करणे आणि सेलिब्रेशन करणे महागात पडले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ९ वाहनेही जप्त केली आहेत.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहित गाव परिसरात २०१६ मध्ये झालेल्या खून प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या झाल्याने त्यांच्या समर्थकांनी येथील विहितगाव चौफुलीवर भरदिवसा मोठा जल्लोष केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कलमाप्रमाणे नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जल्लोष करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्यावर सतरा जनांवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी त्यांना ताब्यात घतले तसेच रहदारीला अडसर निर्माण करणे, मास्क न वापरणे ,जमाव बंदी आदेशाचे नियम मोडणे अश्या विविध कारणांमुळे गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या नऊ दुचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले. आशी माहिती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, गणेश व्हायदे यांनी सहका-यांसह तातडीने कारवाई केली. पोलिस अधिकारी व अंमलदार तत्काळ विहीतगांव येथे गेले असता तेथील रस्त्यावर बेकायदेशीरपणे जमून मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून काही जण उभे होते. वाहतुकीला त्यामुळे अडथळा झाला होता.
नाशिकरोड जेलमधून आठ आरोपी सुटल्याचा जल्लोष जमावामधील काही जण फटाके वाजवून करीत होते. सध्या कोरोनो महामारीच्या काळात सामाजिक अंतर ठेवणे, तसेच मारक घालणे आवश्यक असतानाही या जमावाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. पोलिसांना बघुन रस्त्यावरील जमावाची पळापळ झाली. जमावामधील काहींना पोलीसांनी पकडुन ताब्यात घेतले. रस्त्यावर उभ्या असलेल्या नऊ दुचाकी ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेल्याची नावे
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
विलास सोमनाय बागुल (वय ४०, रा. बागुलनगर, नाशिकरोड), विक्रम प्रकाश गवळी (वय ३०, रा. विहीतगांव, नाशिकरोड), तुषार जालिंदर भुजबळ (वय १९, रा. विहीतगांव, नाशिकरोड), प्रशांत सिध्दार्थ रणशूर (वय २९, रा. विहीतगांव), जतिम सलीम बेग (वय २२, रा. विहीतगांव), अशोक हिरामण बागुल ( वय ५८, रा. विहीतगांव), अवेज जाकीर सैयद (वय २५, रा. विहीतगांव), प्रतिक बाळू बागुल (वय २०, रा. विहीतगांव), निखील रामनाथ नवले (वय २१, रा. विहीतगांव), अमोल शशिकांत जाधव (वय ३२, रा. टाकळी रोड, अनुसया नगर), कुणाल दिलीप वर्वे (वय २८, रा. टाकळी रोड, अनुसया नगर), सुमित सुधीर तपासे (वय २०, रा. वडाळा गांव), शुभम राजाराम गांगुर्डे (वय २४, रा. विहीतगांव), सागर दिपक जाधव ( वय २८, रा. विहीतगांव), श्रीकांत अशोक बकाल (वय २३, रा. विहीतगांव), सुदर्शन कैलास आढाव (वय २२, रा. विहीतगांव), फरहान अन्चर सैयद (वय ३१, रा. गोसावी वाडी, नाशिकरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे सागर कोकणे (रा. चेहडी पंपींग), संदिप बरसिंग शिंदे (रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) हे घटनास्थळावरून पळून गेले.
बघा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=442269563727419