नवी दिल्ली – जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षा येत्या ३ जुलै २०२१ रोजी देशभरात घेतली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूर या संस्थेकडून घेतली जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)च्या इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहिर केल्यानंतर जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या तारखांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता या परीक्षेची घोषणा झाल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक यांना अभ्यास व आयोजनाचे नियोजन करता येणार आहे.