नाशिक – नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. देशभरातील विविध केंद्रांवर जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील चाचणी म्हणजेच जेईई अँडव्हान्स परीक्षा २७ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.
जेईई अँडव्हान्स परीक्षेसाठी नाशिक शहरात ११ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर दिवसाच्या दोन प्रहरात परीक्षा आयोजित करण्यात आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संबंधी उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नाशिक शहर समन्वयक रोहिणी जोशी यांनी दिली आहे.
जेईईच्या परीक्षेची काठीण्य पातळी लक्षात घेता फक्त १० टक्के विद्यार्थी अँडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता ज्या विद्यार्थ्याना परीक्षा देणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.