नवी दिल्ली – देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई-अॅजडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या गांगुला भुवन रेड्डी आणि दिल्लीच्या वैभवराज यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे. रुरकीची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
जेईई अॅडव्हान्सच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जेईई-मेन्स या परीक्षेतून ४३ हजार २०४ विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा देण्याची संधी मिळाली. या परीक्षेचा निकाल रिझल्ट डॉट जेईई एडीव्ही डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.