जीवनात खरोखरच आनंदी राहायचे आहे?
या स्पेशल टॉप टेन टिप्स फॉलो करा…..
१) स्वतःकडून स्वतःसाठी पूर्ण होतील त्याच अपेक्षा ठेवा. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही.
२) छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन रमवा. छोटे छोटे छंद लावून घ्या.
३) भांडण, राग अथवा गैरसमज हे कोणतीही समस्या सोडवू शकत नाहीत
४) प्रत्येक घटनेला तीन बाजू असतात. एक आपली, एक समोरच्याची व एक खरी. खूप बोलण्यापेक्षा मोजके व अभ्यासू बोला.
५) कोणती तरी एक कला मनापासून जोपासा. त्या कलेसाठी रोज थोडा वेळ द्या.
६) हलक्या कानाचे राहू नका. इकडची गोष्ट तिकडं सांगण्यापेक्षा समोरासमोर स्पष्ट करावी.
७) टीकाकार होण्यापेक्षा सल्लागार होणे जास्त महत्त्वाचे आहे. हालहवाल विचारण्यासाठी स्वतःहून फोन करा.
८) आपल्यावरचा विश्वास टिकवून ठेवा. तीच खरी आपली ओळख असते.
९) निर्धास्त राहा, पण गाफील राहू नका. एकाच प्रकारच्या उत्पन्नावर अवलंबून राहू नका.
१०) वस्तूपेक्षा माणसावर प्रेम करा. वस्तू हव्या तेवढ्या मिळतील. माणूस परत मिळत नाही….
-
पंडित दिनेश पंत