नवी दिल्ली – गुगलने गेल्या आठवड्यात काही अँप्लिकेशनचे लोगो बदलले आहे. यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या जीमेलचा समावेश आहे. M आकारातील नवा लोगो यात समाविष्ट करण्यात आला आहे. यात निळा, लाल, हिरवा आणि पिवळा कलर आहे. याआधी लाल आणि पांढरा असे दोनच रंग लोगोमध्ये होते. गुगलने केलेल्या याबदलावर जीमेल धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अचानक बदल करण्यात आल्यामुळे जीमेल शोधण्यास वेळ लागत असल्याची तक्रार धारकांनी केली आहे. नव्या लोगोमुळे कामकाजात गोंधळ वाढत असल्याचे मत वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे. नव्या लोगोवरील विविध मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. ट्विटरवर देखील मोठ्या प्रमाणात या नव्या लोगोच्या रंगांवरून गुगलला ट्रॉल केले जात आहे. तथापि, २०१३ मध्ये जीमेलचा क्लासिक लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर सात वर्षांनी हा बदल करण्यात आला आहे. मात्र, नव्या बदलावर धारकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.