जीमेल वापरायचे की आउटलूक ३६५ वापरायचे असा गोंधळ काही वेळेला होतो. याचे कारण आउटलूकमध्ये ज्या सहजतेने ऑफिस applications वापरता येतात तितकी जीमेलमध्ये वापरता येत नाहीत. गूगलची स्वतःची applications वापरायला लागतात. आता जीमेलने याची दखल घेतली आहे. गूगलची पेड सर्विस वापरत असाल तर जीमेलमध्ये ऑफिस applications एडिट करता येत होती. मात्र जे ही सर्विस वापरत नाहीत त्यांची संख्या बहुमतात आहे. त्यांना जीमेलमध्ये अटॅचमेंट म्हणून पाठवलेली ऑफिस applications एडिट करण्यासाठी जीमेलच्या बाहेर पडावे लागत होते. आता जीमेलमध्येच ही अँप्लिकेशन्स एडिट करता येतील.
जीमेल अपडेट होत असून येत्या दोन आठवड्यात टप्प्याटप्प्याने सर्वाना ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल. समाज तुम्हाला कोणी मायक्रोसॉफ्ट वर्ड ची फाईल आत्ताच करून पाठवली तर यापुढे त्या फाईलच्या बाजूला एडिट असे बटन येईल. ती फाईल एडिट करून मेलला reply करताना बदललेली फाईल लगेच पाठवता येईल. आधी डेस्कटॉपवर सेव्ह करायची, एडिट करायची आणि मग परत attach करायची हा गोंधळ टळेल.
आणखी एक सोय होणार आहे. गूगल ड्राइव अॅप्लिकेशन फोनवर वापरत असाल तर तेही अपडेट होते आहे. नवीन सुविधेद्वारे यातील सर्च क्षमता वाढविण्यात आली असून तुम्ही लॅपटॉप अथवा कम्प्युटर दिलेला सर्च आपोआप मोबाईलवर गूगल ड्राइव अॅप्लिकेशनवर दिसेल. परत नवीन सर्च करायची गरज नाही.
(साभार – https://ashokpanvalkar.com/)