लखनऊ – उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जीन्स न घातल्यामुळे आणि डान्स न केल्यामुळे एका युवकाने आपल्या पत्नीला तलाक दिल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर आरोपी मंगळवारी आपल्या पत्नीच्या माहेरी जाऊन पोचला आणि स्वतःवर केरोसीन टाकून स्वतःला जाळून घेतले. कुटुंबाच्या सदस्यांनी युवकाला वाचवले आणि घटनेची सूचना पोलिसांना दिली. सध्या प्रस्तुत युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.
मेरठच्या न्यू इस्लाम नगरचा रहिवासी असलेला अमिरुद्दिनने आपल्या मुलीचा माहजबीचा निकाह आठ वर्षांपूर्वी पिल्खुवा गावचा रहिवासी असलेला अनस याच्याशी करवला होता. अनस दिल्लीला नोकरीला आहे. काही महिन्यांपासून तो आपल्या पत्नीला त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर गावात पंचायत सुद्धा झाली होती. महिलेने आरोप लावला होता की पती तिला जीन्स घालण्याची, सोबत डान्स करण्याची आणि गाणे गाण्याची जबरदस्ती करतो. पंचायतीद्वारे उपाय सुचवून देखील दोन्ही पक्षांमध्ये काहीही समझोता न झाल्याने अनसने माहजबी ला तलाक दिला आणि ती आपल्या माहेरी निघून गेली.
अमिरुद्दिन यांनी सांगितले की त्यानंतर मंगळवारी रात्री अनस त्यांच्या घरी पोचला आणि स्वतःवर केरोसीन टाकून स्वतःला आग लावून घेतली. कुटुंबाच्या सदस्यांनी पाणी टाकून त्याला वाचवले. या दरम्यान अनस काही प्रमाणात भाजल्या गेला. कुटुंबाच्या सदस्यांनी त्याला जाळण्या पासून वाचवले असते तरीही नंतर त्याची चांगलीच धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.