नवी दिल्ली – वस्तु आणि सेवाकरचा रोख रकमेच्या स्वरुपात भरणा करावा यासाठी करदात्यांना दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅप वरून संपर्क करण्यासंबंधी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
वस्तु आणि सेवाकर अधिकारी अशा तऱ्हेनं करदात्यांशी संपर्क साधत असल्याची कथित माहिती माध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
चालू आर्थिक वर्षाचा शेवटा महिना असलेल्या मार्च २०२१ची वस्तु आणि सेवाकर थकबाकी भरण्यासाठी करदाते, त्यांच्या पत खात्यात उपलब्ध असलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा, उपयोग करु शकतात असंही सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे.