नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, एक 131 कोटी रुपयांचे आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस अवैध व्यवहाराचे रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी 3 करदात्यांचा समावेश असून त्यापैकी एक महाराष्ट्रातील आणि दोन कर्नाटकातील आहेत.
क्रूत्रिम बुध्दिमत्तेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)मिळविणाऱ्या एका करदात्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेतला गेला.
शोधकार्यानंतर असा करदाता बनावट असल्याचे आणि अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.त्याचबरोबर पुढील तपासात जीएसटी पोर्टल वर कर भरण्यासाठी अपलोड केलेला करदात्याचा निवासी पत्ता म्हणून असलेले वीजदेयक ही कागदपत्रे बनावट आणि अवैधरीत्या बनविलेली आढळली.
या तपासात उघडकीस आलेले, कर्नाटकातील दोन करदाते जे या अवैध व्यवहाराचा भाग होते,त्यांनी त्यांची नोंदणी त्याच दिवशी केली होती आणि REG 01 मधे समान ईमेल पत्ते दिले होते आणि तेच एकमेकांचे पुरवठादार आणि तेच खरेदीदार असल्याचे नमूद केले होते असे त्यांच्या तपशीलात आढळून आले .
– एकूण मिळालेले बनावट आयटीसी = 26.09 कोटी रुपये
– गुंतलेले एकूण घटक = 3
– गुंतवणूक केलेल्या सेवा = कार्य सेवा करार, कामगार पुरवठा
हे प्रकरण पुढील कारवाईसाठी वस्तू आणि सेवा गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या, क्षेत्रीय विधी विभागाकडे सुपूर्द केले आहे, यातील मुख्य आरोपी कर्नाटकातील असल्याची नोंद आहे.