गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जीएसटीचा ३१ कोटीचा बोगस Input Tax Credit प्राप्त केल्याप्रकरणी उद्योजकास अटक

by Gautam Sancheti
जानेवारी 15, 2021 | 4:25 pm
in इतर
0

 

मुंबई –  महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही सुरु ठेवत१५ जानेवारी २०२१ रोजी अनुज महेश गुप्ता यांस विलेपार्ले, मुंबई येथून अटक केली आहे. अनुज गुप्ता यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे सॅवी फॅब्रिक्स; शिव टेक्सटाईल, शक्ती टेक्सटाईल अशा तीन कंपन्या महाराष्ट्रात तर सुभलिन फॅब्रिक्स व शुभमंगल टेक्सटाईल अशा दोन कंपन्या दादरा व नगर हवेली येथे वस्तू व सेवाकर कायाद्यान्वये नोंदणीकृत आहेत.

या पाच संस्थांच्या माध्यमातून अनुज गुप्ता याने गेल्या चार वर्षात साधारण रू.२७० कोटीहून अधिक रकमेची फक्त देयके खरेदी केल्याचे आढळून आले आहे. कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखविलेल्या या बोगस खरेदी देयकांतून या पाच कंपन्यांनी सुमारे रू.३१ कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला तसेच रू.११ कोटीहून अधिक रकमेचा प्रत्यक्ष परतावा शासनाकडून प्राप्त केला. सदर कंपन्यांनी E-Way Bill मध्ये नावे दाखविलेल्या विविध वाहतूकदारांनी आपण या पाच कंपन्यांसाठी प्रत्यक्षात मालाची वाहतूक केली नसल्याची कबुली तपासात दिली आहे. तसेच पाच कंपन्यांकडे त्यांनी दावा केलेल्या एकूण मालापैकी फक्त २०% एवढया रकमेचा माल प्रत्यक्ष आढळून आला. उर्वरित ८०% एवढ्या किंमतीचा माल या कंपन्यांकडे प्रत्यक्ष आढळून आला नाही. माल दादरा नगर हवेली येथील गोडाऊनमध्ये ठेवल्याचा दावा अनुज गुप्ता यांनी केल्यामुळे दादरा नगर हवेली वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली.

अनुज गुप्ता यांस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनुज गुप्ता यांचे हे कृत्य दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार ०५ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासास पात्र आहे. या सलग तिसऱ्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

 दिंडोरी : तालुक्यात उत्साहात मतदान संपन्न, ८२२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद   

Next Post

दिंडोरी – खेडगांव जि.प.गटातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचे सदस्यांचा सत्कार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिंडोरी - खेडगांव जि.प.गटातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचे सदस्यांचा सत्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011