देवळाली – जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवळाली कटक मंडळाने पत्र दिले. या पत्रावकर उपमुख्यमंत्रीपवार यांनी जीएसटी आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेशीत केले.
या पत्रात म्हटले आहे की, देवळाली मतदार संघामध्ये देवळाली कटक मंडळ (CANTONMENT BORAD) असून केंद्र सरकार कडून मिळणारे अनुदान हे अतिशय तूटपुंजे मिळत असल्याने सदर कटक मंडळ परिसरातील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. सद्य परिस्थितीत तेथील कर्मचाऱ्यांना गेल्या २ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच या कटक मंडळ क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांना राज्य शासनाच्या कोणत्याही योजना व विकास कामांसाठी निधीचा लाभ मिळत नसल्याने येथील नागरीक विकासापासून वंचित राहिल्यामुळे येथील जनतेचे राहणीमान उंचावत नाही.
मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील कटक मंडळांना तेथील राज्य सरकारकडून जीएसटीचा परतावा दिला जात असून तेलंगाना राज्यात यावर विचार विनिमय सुरू आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कटक मंडळांना GST परतावा परत करावा.