नाशिक – आपल्या जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यू’ची एकही केस अद्यापपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.अनावश्यक पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच सध्या कोव्हिड युद्धामध्ये उपयोगी ठरणारे प्रोटीनचे मार्ग म्हणजे अंडी आणि चिकन यांच्या वापरावर देखील प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या पदार्थांचा वापर सुरू ठेवावा असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.