नाशिक – आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी त्याची परवड सुरू असतांना त्यांनी पिकवलेला मका हा विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी गेले असता तेथील आदिवासी विभागाचे अख्यारीतीत सुरू असलेले खरेदी केंद्र सुरूच न झाल्याने मका उत्पादक शेतकरी राज्याच्या यंत्रणेसामोर हतबल झाले असून उत्पादित केलेली मका खराब होऊन प्रचंड नुकसान होणार आहे .केंद्राकडून वाढीव मका खरेदी मंजूर झाली असतांना देखील फक्त राज्यसरकारच्या ढिसाळ नियोजना अभावी मका खरेदी बंद आहे .केंद्रसरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .प्रशासन आता तरी जागे होऊन शेतकऱ्यांना न्याय देणार आहे का? असा संतप्त सवाल खा .डॉ भारती पवार यांनी केला आहे .जिल्ह्यातील मका खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे व राहिलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांची मका त्वरीत खरेदी करण्यात यावी अशी मागणी खासदार डॅा. भारती पवार यांनी राज्याकडे केली आहे