नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून शुक्रवारी दिवसभरात तब्बल ६५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४९९ जणांचा कोरोनामुळ बळी गेला आहे.
शुक्रवारी दिवसभरात नाशिक शहरामध्ये ६१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांची संख्या आता ९ हजार ४५४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ८३३ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिवसभरात ४१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात नाशिक महापालिकेतील एक तर नाशिक ग्रामीण मधील दोन जणांचा समावेश आहे. दरम्यान, संख्या वाढत असली तरी धाबरण्याचे कारण नाही. योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.