नाशिक – जिल्ह्यात विविध ठिकाणी दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रश्नाकडे दुर्क्ष केल्याने भाजप आणि रासप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार डॉ भारती पवार, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुका भाजपच्या वतीने महाएल्गार आंदोलन निफाड-औरंगाबाद हायवे निफाड चौफुली येथे करण्यात आले. त्याप्रसंगी महाविकास आघाडीच्या शेतकरीविरोधी निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच सरकारने दुधाला ३० रुपये भाव द्यावा. गायीच्या दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे. तसेच दूध भुकटीला निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सुनील बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, बापूसाहेब पाटील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते