नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० हजार २८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४९, चांदवड ५१, सिन्नर १०१, दिंडोरी ४९, निफाड ११९, देवळा ६९, नांदगांव ६७, येवला २५, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १६, पेठ ०३, कळवण ०२, बागलाण २४, इगतपुरी ९८, मालेगांव ग्रामीण ३५ असे एकूण ८२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९ तर जिल्ह्याबाहेरील ०२ असे एकूण २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १३ हजार २६३ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ११३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ४८४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १३ हजार २६३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० हजार २८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ४९९ पॉझिटिव्ह रुग्ण.
(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)