नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० हजार ७१७ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत २ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १४३, चांदवड ५६, सिन्नर ११६, दिंडोरी ५८, निफाड १२२, देवळा ९४, नांदगाव ६३, येवला २२, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा १८, पेठ ०३, कळवण ०२, बागलाण २५, इगतपुरी १०२, मालेगाव ग्रामीण ३७ असे एकूण ८७५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६०८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ९३ तर जिल्ह्याबाहेरील ०२ असे एकूण २ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ७९१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून, नाशिक ग्रामीणमध्ये ७१.४ टक्के, नाशिक शहरात ७९.५ टक्के, मालेगावमध्ये ८६.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७७.८९ इतके आहे.
मृत्यू:
नाशिक ग्रामीण ११६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २७५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८५ व जिल्ह्याबाहेरील २० अशा एकूण ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लक्षणीय :
– १३ हजार ७९१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० हजार ७१७ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ५७८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७७.८९ टक्के.