जिल्ह्यात ५०५ जणांचा मृत्यू
दिवसभरात ६०३ नवीन रुग्ण
नाशिक – जिल्ह्यात चार महिन्यांत ५७ हजार ३५४ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १५ हजार १९ बाधित आढळून आले आहेत. तसेच एकूण बाधितांपैकी ११ हजार ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५०५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दिवसभरात नव्याने ६०३ बाधित आढळून आले असून, २१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. २९ मार्चला जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित आढळून आला. त्यानंतर १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार १९ बाधित आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक बाधित नाशिक शहरात ९ हजार ८०८, ग्रामीणला ३ हजार ७१४, मालेगावला १ हजार ३३५ आणि परजिल्ह्यात १६२ रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (दि.१) दिवसभरात शहरात ३९७, ग्रामीणला १७८ आणि मालेगाव येथे २८ बाधित आढळून आले आहेत. तसेच शहरातील १४२, ग्रामीणचे ७३ आणि मालेगाव येथील दोन असे एकूण २१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ९९३ संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर शहरात ७६०, मालेगावला २२, ग्रामीणला ११८ संशयित आढळून आले आहेत. तसेच ५ संशयित घरातच उपचार घेत आहे.विभागनिहाय कोरोनाचा आढावा
विभाग बाधित कोरोनामुक्त मृत्यू उपचार सुरू
नाशिक ९,८०८ ७,४४९ २८२ २,०७७
ग्रामीण ३,७१४ २,६२७ ११८ ९६९
मालेगाव १,३३५ १,१३१ ०८५ ११९
परजिल्हा १६२ १३७ ०२० ००५
एकूण १५,०१९ ११,३४४ ५०५ ३,१७०
विभाग बाधित कोरोनामुक्त मृत्यू उपचार सुरू
नाशिक ९,८०८ ७,४४९ २८२ २,०७७
ग्रामीण ३,७१४ २,६२७ ११८ ९६९
मालेगाव १,३३५ १,१३१ ०८५ ११९
परजिल्हा १६२ १३७ ०२० ००५
एकूण १५,०१९ ११,३४४ ५०५ ३,१७०