नाशिक – गेल्या काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला दिलासा दिला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमध्ये ६९ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. तर, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणही ९० टक्के भरले आहे. त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. आगामी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभााने वर्तविला आहे. त्यामुळे जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
धरण – क्षमता – आजचा पाणीसाठा – टक्केवारी
गंगापूर – ५६३० – ५०५८ – ९०
काश्यपी – १८५२- ९२८ – ५०
गौतम गोदावरी – १८६८- १०९७ – ५९
आळंदी – ९७० – ३३५- ३५
पालखेड – ६५३- ४७९- ७३
करंजवण – ५३७१- २३१२- ४३
वाघाड – २३०२ – १०७८ ४७
अोझरखेड – २१३० – ९७४- ४६
पुणेगाव – ६२३ – २५४ – ४१
तिसगाव – ४५५- ७१- १६
दारणा – ७१४९- ६६१६- ९३
भावली – १४३४ – १४३४ – १००
मुकणे – ७२३९- ४७१८- ६५
वालदेवी – ११३३ – ११३३ – १००
कडवा – १६८८ – १६८८ – १००
नांदुरमध्यमेश्वर – २५७ – १६९- ६६
भोजापूर – ३६१- ३६१ – १००
चणकापूर – २४२७ – १९१६- ७९
हरणबारी – ११६६ – ११६६ – १००
केळझर – ५७२ – ५४९ – ९६
नागासाक्या – ३९७ – ३४३ – ८६
गिरणा – १८५०० – १११६७ – ६०
पुनद – १३०६ – ११४३ – ८८
माणिकपुंज – ३३५ – ३३४ – १००
एकुण – ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफुट
उपयुक्त साठा – ४५ हजार ३२३ दशलक्ष घनफुट
टक्केवारी – ६९ टक्के