नाशिक – गेल्या काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला दिलासा दिला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमध्ये ६७ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. तर, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणही ८७ टक्के भरले आहे. त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्के कमी जलसाठा आहे. आगामी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभााने वर्तविला आहे. त्यामुळे जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.