नाशिक – जिल्ह्यातल्या १०१ हॉस्पिटल्सना ४१५३ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. यामध्ये शासनाने १० एप्रिल रोजीच्या आदेशाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या सर्व रुग्णांना इंजेक्शन आज मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
ते म्हणाले की, सर्वांना त्यांच्या नोंदवलेल्या मागणीच्या प्रमाणात मिळाले आहे व पहिल्याच दिवशी मागणी पूर्ण करता आली. काल मी स्वहस्ते चार्ट तयार करून कार्यपद्धती ठरवून दिली होती. त्यावर आज आमच्या टीम ने कष्टपूर्वक प्रत्यक्ष अंमलबजावणी केली याचा आनंद आहे. या सर्व कार्यपद्धतीबद्दल हॉस्पिटल असोसिएशनने समक्ष भेटून दुपारी समाधान व्यक्त केल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.