नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला व विविध कार्यकारी सहकारी संस्थाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरीता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आले होते.त्यासाठी जिल्हा बॅंकेने नवीन आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० ही सुरु केली. या योजनेची मुदत सप्टेंबरमध्ये संपली होती. पण, आता या योजनेला पुन्हा एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ असणार आहे.
जिल्हा बँकेला व विविध कार्यकारी सहकारी संस्थाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरीता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आले होते . त्याचप्रमाणे विविध कार्यकारी संस्थाच्या मोठे थकबाकीदार, प्रभावशाली थकबाकीदार यांच्या मालत्तेवर सहकार संस्था कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु गत ३-४ वर्षापासून कर्जमाफी योजनाचे अंबलबजावणीमुळे व नैसर्गीक आपत्ती जसे अतिवृष्टी व गारपीट यामुळे बँकेची थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढलेली असून बँकेचे व वि.का.संस्थाचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी प्राथमिक शेती संस्थास्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसूल होणे आवश्यक असल्याने तसेच प्राथमिक शेती संस्था व थकबाकीदार सभासदाकडून जुन्या सामोपचार योजनेऐवजी नवीन आकर्षक योजना राबविणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती.
त्याकरीता बँकेची सध्याची सुरु असलेली सामोपचार कर्ज परतफेड योजना (O.T.S) तसेच बँकेचा / वि का संस्थाचा वाढलेला एनपीए व त्यानुसार असलेल्या कालनिहाय व रक्कमनिहाय थकबाकीचे व अपेक्षित वसुलीचे अवलोकन करून नाबार्ड व आरबीआय यांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने संचालक मंडळ २७ मे २०२० अन्वये नवीन सुधारीत सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० या नावाने राबविण्यास मान्यता देण्यात आलेली होती. सदर योजनेत भाग घेणाऱ्या कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर ५० टक्के सवलत (योजनेच्या मुळ अटी नुसार ) किंवा जास्तीत जास्त रुपये ४.५० लाखापर्यंत सवलत थकबाकीदार सभासदांनी देण्यात येत आहे. थकबाकीदारावर कमल १०१ व १०१ (२) १०७ , अन्वये चालू असलेली जप्ती,अपसेट प्राइस व लिलाव कारवाई आहे त्या स्तरावर या योजनेतील अटीनुसार कर्जाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यत स्थगीत ठेवली जाणार आहे.
३० सप्टेंबर २०२० पावेतो सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० योजनेत ८८५ सभासदांनी भाग घेऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता महिनाभर वाढल दिल्यामुळे त्यात शेतक-यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.