नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मातोश्री मुलकणबाई (माय) तानाजी आहेर (वय ७२) यांचे रात्री २.४० वाजता निधन झाले. त्यांच्यावर सुयश हॉस्पीटल नाशिकमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावई, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज शनिवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता देवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारनेअंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे त्याचे पालन करून देवळ्यात अंत्यसंस्कार केले जातील असे आहेर परिवारांनी सांगितले.