नाशिक – जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नाशिक जिल्हा रुग्णालय येथे कोविड 19 प्रतिबंधक घेतली. याआधी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातल्या अधिका-यांचे प्रतिनिधित्व करत प्रथमत: स्व्तः लस टोचून घेतली यानंतर आपल्या विभागातील अधिका-यांना कोविड १९ प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुख व महसूल विभागाच्या अधिका-यांनी गुरुवार १८ रोजी नाशिक जिल्हा रूग्णालयातील कोविड १९ लसीकरण कक्षात कोविड प्रतिबंधक लस घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्वत: उपस्थित राहुन सर्व खाते प्रमुख व महसूल विभागाच्या अधिका-यांचे अभिनंदन केले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.पी डी गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी उपस्थित सर्व अधिका-यांचा सत्कार केला.
होय आम्ही लस घेतली, लस सुरक्षित आहे
जिल्हा परिषद – रविंद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
उज्वला बावके, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा,
आनंदराव पिंगळे उपमुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन,
रवींद्र परदेशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत,
महेश बच्छाव मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
दिपक चाटे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण,
रमेश शिंदे कृषी विकास अधिकारी,
डॉ. विष्णुपंत गर्जे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
मंगेश खैरनार जिल्हा संधारण अभियंता,
दादाजी गांगुर्डे कार्यकारी अभियंता इवद १,
विजयकुमार कोळी कार्यकारी अभियंता इवद ३.
महसूल विभाग –
भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी,
अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन,
राजेंद्र नजन, तहसीलदार प्रशासन.